महिलांवरील हिंसाचार थांबले पाहिजेत कुसुमताई अलाम.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : पुरुषाबरोबर महिलाना सर्वच हक्क प्राप्त झाले असले तरी आज महिला हिसाचारास बळी पडत आहेत तेव्हा महिलावरील होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत अश्या प्रकारचे मार्गदर्शक साहित्यीक कुसुमताई अलाम यांनी सावित्री बाई फुले स्मृतिदिना निमित्य जांभीया गठ्ठा येथील कार्यक्रमा प्रसगी काढले . सावित्रीबाई फुले स्मृति दिनाचा कार्यक्रच्या वेळी सुरजागड इलाक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एड अश्विनी ऊईके कोरची यांनी पेसा,ग्रामसभा, संविधानिक महिला हक्क यावर सविस्तर मार्गदर्शन केले.मा.सैनुजी गोटा सुनिता उसेंडी,मा.सचिन मोतकुलवार यांनी अतिशय तळमळीने महिलांना हक्काची जाणीव करून दिली.शिलाताई सैनुजी गोटा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.बेडकेताई यांनी संचालन केले.ध्वजारोहण व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.पारंपारिक नृत्य सादर केले.यावेळी काही ठराव मंजूर करण्यात आले.
ठराव
1) जमीन,जंगल,नैसर्गिक संसाधन क्षेत्रातील आदिवासी महिलांच्यावरील अत्याचाराचे संशोधन करणे
2) सर्व स्तरातील आदिवासी महिलांचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक आरोग्य आर्थिक शैक्षणिक यावरील वर्तमान स्थितीचे अध्ययन करणे.
3) वनसंवर्धन नियम 2023 रद्द करणे
4) आदिवासी तथा सर्व महिलांवरील हिंसाचार थांबवणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कृती कार्यक्रम, जाणीवजागृती करणे
5) आदिवासी समाजावर समान नागरी कायदा लादू नये.
6)धर्माचे उदात्तीकरण नको, डिलिस्टींग थांबले पाहिजे.
7) पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण संवर्धन आणि पारंपरिक नृत्य संगीताचा आदर करणे
8) मातृभाषेत शिक्षण व अधिक प्रमाणात शाळा सुरू ठेवणे.इत्यादी ठराव एकमताने घेण्यात आला.यावेळी कल्पना अलाम,गीताताई हिचामी,विद्या पराते, सुशीला नरोटे,गावचे पोलिस पाटील, सरपंच व मान्यवर हजर होते.मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.