महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी. - सौ.उषाताई भोयर ■ अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा. ★ अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार.

महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी. - सौ.उषाताई भोयर


■ अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा.


★ अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार.


एस.के.24 तास


सावाली : दिनांक :- ०८ मार्च २०२४ जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानार्थ जगात सर्वत्र साजरा केला जातो.अनेक कर्तृत्वान स्त्रियांनी आपल्या कार्यातून तसेच पुरुष्यांचा खांद्याला खांदा लावीत देशाचे नाव लौकिक केलेले आहे त्यांचा सन्मान व स्मरून करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांचा या दिवशी सत्कार केला जातो.त्याच निमित्याने  मौजा.अंतरगाव येथे,पाथरीचे मावळते पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांचा निरोप समारंभ व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.*


याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती,या सत्काराबद्दल सत्कारमुर्ती पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांनी सर्व महिला भगिनी व आयोजकांचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पत्नी यशोधरा यांनी गौतम बुद्ध यांनी गृहत्याग केला तेवा त्यांनी जे धैर्य दाखवत कुटुंबाचा सांभाळ केला.


 व नंतर पतीच्या मार्गांवर चालत त्यांनी सुद्धा गृहत्याग करीत संन्यास धारण केले त्यांचे हे त्याग जगाला आदर्श देणारे आहे एक स्त्री कश्याप्रकारे आपला परिवार व तसेच समाजात वावरात असते किती समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते राणी यशोधरा हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत, त्यांचा आदर्श सर्व महिलांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.


तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.उषाताई भोयर यांनी महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी,येत्या काळात महिला या अबला नवे तर सबला बनून जगासमोर या असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.जयश्री चेकबंडलवार यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !