शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२९/०३/२०२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे छत्रपती शिवजयंती महोत्सव समिती च्या वतीने बाजार चौक येथील पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वकील एडवोकेट हेमंत जी उरकुडे ब्रह्मपुरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक मोंटू पिलारे शिवस्मारक प्रतिष्ठान ब्रह्मपुरी यांनी प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉ.प्राध्या. धनराज खानोरकर पत्रकार,
कवी,डॉ.प्रा.मोहन कापगते नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, वामनरावजी मिसार सामाजिक कार्यकर्ता, रवींद्र पवार सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मपुरी, जितेंद्र क-हाडे उपसरपंच, मनोज ढवळे माजी सरपंच अ-हेरनवरगाव, सुभाष ठेंगरे माजी सैनिक,
अमरदीप लोखंडे, संजय ढोरे व अन्य मान्यवर मंडळी अ-हेरनवरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून आणि त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ प्राध्या.धनराज खानोरकर यांनी आपल्या बहारदार शैलीतून तोलून मारून शब्दाची फेक करून प्रेक्षकांना पोट धरायला हसत लावून त्यांची मने जिंकली आणि कार्यक्रमांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.
शिवजयंतीच्या मंगलमय सोहळ्या प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गावातीलच एका गरीब कुटुंबाचे लग्नकार्य पार पाडल्यानंतर संपूर्ण गाव वाशीयांना शिव भोजन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्या विनीत ठेंगरे यांनी पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील बालगोपालापासून ते वयोवृद्ध नागरिकांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यास मदत केली.छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला अफजलखानाचा वध हा प्रसंग अ-हेरनवरगाव येथील सांस्कृतिक मंडळाने सादर करून कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून लोकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.