मुल तालूका शेतकरी,शेत मजूर एल्गार परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ; रेती/वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासनानेचे वतीने योजना राबवल्या जात आहेत.त्यात गावा गावात घरकुल व विहीरी वाटप सुरू आहे.परंतु यात लाभार्थ्यांना रेती साठी भटकावे लागत आहे त्यामुळे बांधकामे थांबले आहेत,या योजना मध्ये निधी कमी असतो व खर्च जास्त असते त्यातच रेती ची मोठी समस्या निर्माण झाली आहे.करीता राज्याचे मुख्यमंत्री यांना ग्राम पंचायत स्तरावर रेती उपलब्ध करून देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मूल यांचे मार्फतीने केली आहे.
यात शेतकरी शेतमजुर एल्गार परिषदेचे तालूका अध्यक्ष ओमदेवजी मोहूर्ले,जिल्हा उपाध्यक्ष,नंदू बारस्कर ,चिमढा येथील माजी सरपंच,गजाननजी चौधरी,टेकाडी चे सरपंच,सतीश चौधरी, वनराज पेळूकर,सुधिर गोवरधन,अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्यकर्ते विनायकराव निकोडे, नकटूजी मेश्राम ताडाळ,मायाबाई कोकोडे चिचाळा,राज बावणे,संदिप रायपुरे,अरविंद गांडलेवार,अजय ताऊलवार दामोधर भोयर निवेदन देताना इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.