मोहित माधुरी नकुल अलाम याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड.
एस.के.24 तास
चामोर्शी : तालुक्यातील मोहोर्ली (मो.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मोहित माधुरी नकुल अलाम यांनी नुकत्याच घोषित झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेत सुयश मिळवले आहे. यामध्ये मोहितची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली.
मोहित हा गावातील अतिशय बुद्धिमान, हुशार, संयमी विद्यार्थी आहे. नवोदय परीक्षेसाठी त्याला त्याचे शिक्षक मारोती आरेवार,मदन आभारे,प्रभाकर गव्हारे , आई माधुरी अलाम यांनी मार्गदर्शन केले.मोहितची शिक्षणातील जिद्द आणि चिकाटी बघून त्याला घडविण्यात त्यांच्या आईची मोलाची भूमिका आहे. कारण वडिलाचे छत्र हरविलेल्या मोहितसाठी वडील आणि आई अशी दुहेरी भूमिका त्याच्या आईने योग्य पद्धतीने बजावली.
विशेष म्हणजे मोहित हा नवोदय विद्यालय शिक्षण घेण्यासाठी जाणारा गावातील पहिलाच विद्यार्थी असणार आहे. या यशाबद्दल गावातील सर्वांनी मोहितच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच मोहीतच्या अतुलनीय यशाबद्दल मोहितचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.