डॉ.नामदेव उसेंडी झाले भाजपवासी.
★ चार डॉक्टरांना हटवून विधानसभेची तिकीट मिळवणार ?
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली - विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक कांग्रेसचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची घोषणा पत्रकार परिषेदत करून लगेचच एका तासाच कॉग्रेसच्या प्राथामिक सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष,चंद्रशेखर बावणकुळे,आमदार बंटी भागडीया यांच्या उपस्थितीत भाजपामधे आपल्या मुलासहीत प्रवेश केला.
व भाजपाचा दुप्पटा बांधला.त्यामुळे काँग्रेस च्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागली आहे.डॉ.उसेंडी काँग्रेस मध्ये असतांना आदिवासी बाधंवासी जवळकी ठेवली होती.आता डॉक्टर भाजपवासी झाल्यामुळे आदिवासी बांधव त्यांना व त्यांच्या पक्षाना कित पत साथ देतील हे येणारा काळच ठरवेल.
एवढे मात्र खरे,डॉ.नामदेव उसेंडी हे भाजपामधे जाताना येणाऱ्या गडचिरोली विधानसभेची तिकीट मलाच मिळाली पाहिजे अशी बोलणी वरिष्ठ भाजप नेत्यासोबत.करून व आनाभाका घेऊनच डॉक्टर भाजपात प्रवेश केल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.डॉ.नामदेव उसेंडी हे लोकसभा निवडणुकीत भाजपामधे चांगली कामगिरी केली.
तर त्यांना गडचिरोली विधानसभेची उमेदवारी नक्कीच मिळू शकते व यात चार डॉक्टराचा गेम केल्या जावू शकतो.चामोर्शी चे डॉक्टर यांच्या अनेक तक्रारी भाजपाकडे आहेतच.नुकतेच भाजपामधे प्रवेश करणारे गडचिरोली काँग्रेस चे डॉक्टर पती पत्नी चौथा स्पंदन चा गडचिरोली येथील डॉक्टर जो खासदारकीची तिकीट मिळावी म्हणुन प्रयत्नशिल होते.अश्या चारही डॉक्टरांचा विधानसभेत पत्ता कट होवू शकते.