राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे वतीने ऍड-ऑन कोर्स चे उद्घाटन.

राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे वतीने ऍड-ऑन कोर्स चे उद्घाटन.


रोशन बोरकर - सावली


सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे वतीने भारतीय " निवडणूक आयोग " या विषयावर ऍड - ऑन कोर्सचे उद्घाटन समारोह आयोजित करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रामचंद्र वासेकर होते तर प्रमुख अतिथी प्रा. सौ. महानंदा भाकरे  व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक खोब्रागडे  उपस्थित होते.


उद्घाटन प्रसंगी डाॅ. वासेकर यांनी भारतीय निवडणूक आयोग यावर मार्गदर्शन केले निवडणूक आयोग भारतातील निवडणुकांचे संचालन करतो व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो निवडणूक आयोगाची भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असून लोकशाही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी निवडणूक कार्यक्रमांमध्ये जनजागृती करावी व भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.

       

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य अशोक खोबरागडे यांनी  या कोर्स चे महत्व समजावून सांगताना भारतीय निवडणूक आयोगाची रचना कार्य व भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. हा 30 तास चालणारा कोर्स असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगा विषयी ज्ञान अवगत व्हावे यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

   

उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सौ. भाकरे मॅडम यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन किरण कापगते यांनी केले तर आभार प्रा साकेत बल्लमवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !