बहुजनांना सत्ता मिळवायची असेल तर बसपा महत्वाची. - गोपाल खांबाळकर

बहुजनांना सत्ता मिळवायची असेल तर बसपा महत्वाची. - गोपाल खांबाळकर 


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : बहुजन नायक कांशीराम यांचा वाढदिवश साजरा. गडचिरोली- बिजेपी व कांग्रेस एकाच नाण्याच्या बाजु आहेत.म्हणुन बसपा यांच्या पासून चार हात दुरच राहुन बसपा आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविते. माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांनी उत्तर प्रदेशात सत्ता मिळवून दाखवितो मग महाराष्ट्रात का नाही.


आमचा पक्ष भारतात तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे.तशी तयारी महाराष्ट्रात सुरु आहे.परंतु बहुजनाचे राज्य येवू नये म्हणून भाजपा व कांग्रेसवाले बसपाला सत्तेत येऊ देत नाही. ते बसपाला घाबरतातही आपल्या स्वतंत्र पक्ष निवडून येऊ शकतो.


तसेच प्रस्तापित इतर पक्षाच्या उमेदवारांना पाडू शकतो हि शक्ती बसपात आहे म्हणुन येत्या लोकसभा निवडणुकीत छोट्या - मोठ्या पक्षाला सामावून घेऊन बसपा तिसरी आघाडी तयार करीत आहे. तरी बसपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन इंजि. गोपाल खांबाळकर कोषाध्यक्ष बसपा मध्यप्रदेश यानी केले. बहुजन नायक कांशिराम यांच्या वाढदिवशा निमित्य बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे केक कापून वाढदिवश इंदिरा गांधी चौक येथे साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून इंजिनिअर गोपाल खांबाळकर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट तर प्रमुख अतिथी म्हणुन ज्ञानदेव रामटेके , रमेश मडावी , प्रशांत खोब्रागडे , प्रा. हेमंत रामटेके , केशव भालेराव सर. सुमन कऱ्हाडे 'भावना खोब्रागडे , कांताबाई कांबळे आदि लाभले होते. याप्रसंगी शंकर बोरकुट म्हणाले की, आजचा दिवश मा. कांशिराम साहेबांच्या वाढदिवसाचा आहे. उद्या पासुन बसपा आपले खरे रुप दाखवेल व लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करेल.


 चिमुर - गडचिरोली लोकसभा निवडणुकीत बसपाचा उमेदवार ठरला आहे. कार्यकत्यांनी कामाला लागावे असे आवाहन बसपा जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट यांनी केले.याप्रसंगी इतर मान्यवरांचे भाषणे झालीत.कार्यक्रमाचे संचलन हेमंत रामटेके यांनी तर आभार अनिल साखरे यांनी मानले कार्यक्रमास गडचिरोली जिल्हयातून बसपाचे कार्यकर्ते बहुसंख्येनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !