ने.हि.महाविद्यालयात शहिद दिन: भगतसिंग,राजगुरू,सुखदेवांना श्रद्धांजली.

ने.हि.महाविद्यालयात शहिद दिन: भगतसिंग,राजगुरू,सुखदेवांना श्रद्धांजली.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,२३/०३/२०२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम शहिद दिन म्हणून घेण्यात आला.

     

सर्वप्रथम प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,अधीक्षक संगीता ठाकरेंनी भगतसिंग, राजगुरू सुखदेवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आपली आदरांजली अर्पण केली.यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे, डॉ योगेश ठावरी, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ पद्माकर वानखडे, डॉ राजू आदे, डॉ विवेक नागभीडकर, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,राजू मेश्राम,अलोक मेश्राम,प्रज्ञा मेश्राम,रोशन डांगे इ.नी पुष्पांजली वाहून आपली श्रध्दांजली अर्पण केली.

        

कार्यक्रमाचे संचालन व आभार समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम,प्रा धिरज आतला यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !