विश्वकर्मा लोहार समाज संघटना कोरेगाव /बोडधा वतीने भगवान विश्वकर्मा मुर्ती स्थापना व विश्वकर्मा जयंती साजरी.

विश्वकर्मा लोहार समाज संघटना कोरेगाव /बोडधा वतीने भगवान विश्वकर्मा मुर्ती स्थापना व विश्वकर्मा जयंती साजरी.


एस.के.24 तास


कुरखेडा : विश्वकर्मा लोहार समाज संघटना कोरेगाव /बोडधा वतीने भगवान विश्वकर्मा मुर्ती स्थापना व विश्वकर्मा जयंती  दि.१५/०३/२०२४ रोजी दुपारी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. रोहित दादा माडेवार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस VJNT भाजपा तर उदघाटक मा सुरेशजी मांडवगडे सचिव वै.गा.लो.व त.जा. महासंघ नागपूर तसेच  सहउदघाटक मा.उत्तम शेंडे सल्लागार महासंघ नागपूर हे होते व प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा. दिलीप भाऊ चित्रीवेकर भटक्या विमुक्त जमाती समन्वयक महाराष्ट्र तसेच मा.वंदना ताई यनगंटवार अध्यक्ष,महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश तसेच सौ.सीमाताई कश्यप विदर्भ प्रदेश अध्यक्ष VJNT भाजपा हे लाभले तर  अतिथी म्हणून मा.दुर्वास सोनवणे उपाध्यक्ष शाखा अर्जुनी तसेच राजूभाऊ बोरीकर आणि प्रभाकर मेश्राम अध्यक्ष ता.शाखा देसाईगंज  हे मंचावर उपस्थित होते.


प्रास्ताविका मध्ये उत्तम शेंडे यांनी भगवान विश्वकर्मा मंदिरा करीता व भव्य समाजभवन करीता ग्रामपंचायत च्या वतीने शासनाकडून  २ एकर जमीनी ची मागणी  केली सोबतच लोहार समाजाला च नाही तर संपूर्ण  भटक्या विमुक्त जमाती तील लोकांना  घरकुल  व शासनाच्या ईतर योजनांचा लाभ मिळायलाच पाहिजेत असी मागनी करीत आपल्या प्रास्ताविक भाषणाला विराम देतांना  कोरेगाव संघटनेचे च्या  समोरच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व दिलासा दिला.  


तर कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लाभलेले  लोहार समाजाचे धडाडीचे नेतृत्व करणारे महासंघाचे सचिव श्री सुरेश मांडवगडे यानी १९७६पासून शासनाकडून  लोहार समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल  संपूर्ण माहिती देवून  ST आरक्षण मिळण्यासाठी २०२० ला महासंघ नी ST आरक्षणाचे पिटीशन मंञालयात सादर केलेली असून  ताकदीने शासना कडे  मागनी केलेली म्हणुन कार्यक्रमात  ठणकावून सांगीतले. 


करीता  समाजानी संघटित राहावे  म्हणुन आवाहन केले.तसेच कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले दिलीप भाऊ चित्रवेकर यांनी कायदेविषयक योजना बद्दलची माहिती देऊन संघटनेला खूप मोलाचे मार्गदर्शन करून समोरही जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करू म्हणुन  बोलले. तसेच सौ.सीमाताई कश्यप यांनी महिला करीता शासनाच्या   अनेक योजना चा लाभ कसा घेतला पाहिजे यावर सविस्तर माहिती दिली असून  समाजानी आपले हक्क मिळवून घेण्यासाठी  योग्य सरकारलाच  निवळून देण्याबाबत आवाहन केले.


तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.डॉ.रोहीत दादा माडेवार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी  समाजाची व्यथा व दशा याचे विचार मंथन आखून   परीस्थीती वर  मात करून  समस्या सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे कधीही आवाज दिले तरी मी येनार ऐवढे बोलून आपले अध्यक्षीय भाषण संपवीले.

     

कार्यक्रमाला  विभागातील बहुसंख्येने समाजातील महिला व पुरूष उपस्थित होते.संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र  बावने ,उपाध्यक्ष पीतांबर बावने,सचिव लोकेश वकेकार,गुरुदेव  गेडाम, सुरेश घुघुसकार, दादाजी बावने, रमेश बावने, सुखदेव शेंडे,लोकेश शेंडे सौ.लता वकेकार,सौ.अनिता गेडाम,सौ.स्नेहा बावणे,सौ.भारती कोसरे,गुलाब मेश्राम, प्रभाकर बावने,श्रावण कोसेकार,संजय कोसरे, गुरूदेव सागरकर,महागुजी बावने  अविनाश घुघुसकार इ. कार्यक्रमाचे संचालन मा.उत्तम शेंडे  यांनी केले असून  आभार लोकेश वकेकार यांनी केले.


सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता  महाप्रसादाचे  वाटप करून  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजातील अनेक बांधवानी मोलाची सहकार्य दिले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !