महिला दिनानिमित्त प्रबोधन रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०३/२०२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लोकसंख्या शिक्षण मंडळ,महिला अध्ययन सेवा केंद्र आणि राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे महिला प्रबोधन रॅलीचे आयोजन करुन ब्रह्मपुरी च्या बोंडेगाव वार्डात प्रबोधन कार्यक्रम प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे च्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करुन समाजाला सजग संदेश देत प्रबोधन केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ किशोर नाकतोडे,डॉ.कुलजित शर्मा, डॉ पद्माकर वानखडे,डॉ.अजित खाजगीवाले,डॉ.योगेश ठावरी,डॉ.रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,डॉ प्रकाश वट्टी,डॉ.अतुल येरपुडे,प्रा मनिषा लेनगुरे ई.
मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी स्वाती धनविजय,सुषमा ठुसे,समीक्षा पंडीत,तनया नाकतोडे,शिवानी नागोसे यांनी मोलाचे सहकार्य केले.