जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अ-हेरनवरगाव येथे महिला दिन साजरा.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,०९/०३/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने यांनी महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगताना आजच्या युगात विविध क्षेत्रात मारलेली उंच भरारी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक-शिक्षिका एस .डब्ल्यू. खरकाटे ,गजघाटे, निकुरे, मुन, पातोडे, स्वयंसेवी का रवीना कुथे, वैष्णवी नागरे ,विनीता सोनवाणे उपस्थित होते.