डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जागरुकता कार्यक्रम संपन्न.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जागरुकता कार्यक्रम संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : २१/०३/२४ मानवी जीवनात आरोग्याला फार महत्वाचे स्थान आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानव स्वतःच्या आरोग्याकडे  दुर्लक्ष करून स्वतःवर विविध रोग,आजार ओढवून घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी स्वतःच्या आरोग्याला जपावे व सुदृढ नागरिक बनावे यासाठी  डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील महिला अध्ययन केंद्र, महिला तक्रार निवारण समिती, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.

          

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंजिरा अंबिलडुके, समुपदेशक ,ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी या उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना  खानपानाच्या योग्य सवयी, व्यायामाचे महत्त्व,  व्यसनाधीनता व त्यामुळे निर्माण होणारे विविध रोग तसेच वयानुसार झालेले शारीरिक व मानसिक बदलामुळे आलेल्या समस्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारा ताण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. 

                 

यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी सजग असणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजशास्त्र विभागप्रमुख  डॉ. स्निग्धा कांबळे यांनी आरोग्य हे निसर्गाच्या द्वारे माणसाला मिळालेले सर्वोत्तम भेटवस्तू आहे असे सांगितले व विदयार्थी या कार्यक्रमातून स्वतःच्या आरोग्याविषयी सदैवसाठी जागृत होतील असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचा निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून मंचावर प्रा.तुफान अवताडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू.पायल व आभार कु.संध्या यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !