महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भो)कर्मचारी निधीतून आजारी विद्यार्थीनी ला आर्थिक सहाय्य.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३१/०३/२०२४ महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथिल कर्मचारी सहायता निधीतून वर्ग ९ मध्ये शिकत असणारी विद्यार्थ्यांनी कु,सिमरन ईशान मेश्राम हिला १३ हजार रुपये आर्थिक निधी विद्यालया चे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे व शिक्षक रुपेश पुरी यांचे हस्ते देण्यात आले.
तिची अचानक तब्येत बिघडल्या ने तिला आय सी यू मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या उपचारासाठी१३ हजार रुपयाचा धनादेशा तिचे वडील श्री ईशान मेश्राम यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी तिच्या आई व वडीलानी विद्यालया च्या सर्व कर्मचारी वृंदांचे आभार मानले.