एस.के.24 तास
गडचिरोली : ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन ओबीसी समाज संघटनेतील युवक 4 मार्च पासून साखळी उपोषनावर होते. आज दि.8मार्च रोजी, राज्याचे अन्न व औषधं प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम आणि राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 8 मार्च रोजी, ओबीसी युवा समाज संघटना च्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषनास भेट दिली, व उपोषणकर्त्या युवकांशी चर्चा केली.
यावेळी ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषण समाप्त केले. शासन ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या बाबत मा. मुख्यमंत्री व ओबीसी कल्याण मंत्री यांच्याशी सोमवारी चर्चा करून मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी युवकांना आश्वसत करून त्यांच्या रास्त असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व साखळी उपोषण मागे घेण्याकरिता विनंती केली असता राज्याच्या दोन प्रमुख नेत्याने आश्वासन दिल्या मुळे ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने साखळी उपोषण मागे घेतले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे मोठे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
उपोषण कर्ते राहुल भांडेकर,अनुप कोहळे, पंकज खोबे, पदंम भुरसे, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, नयन कुनघाडकर, महेंद्र लटारे सह यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सुरेश भांडेकर, मंगला कारेकर, नम्रता कुत्तरमारे, वंदना चपले, चंद्रकांत शिवणकर, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर,आकाश आंबोरकर, बादल गडपायले, रोशन कोहळे, प्रफुल आंबोरकर, साहिल धोडरे, सचिन पिपरे, सत्यवान पिपरे, मोरेश्वर चौधरी, अमित सुरजगाडे,नंदकिशोर भांडेकर, आकाश भोवरे, स्नेहल कुनघाडकर, नितेश कुंनघाडकर, निलेश कुंनघाडकर, पवन बरसागडे,
पंकज सातपुते, अक्षय कोठारे, प्राणिल सातपुते , अभिषेक कुंनघाडकर, दीप सातपुते, सुरज कुनघाडकर,मनोरंजन गव्हारे, नरेश आभारे, आकाश सातपुते, आकाश सोनटक्के, रोशन सातपुते,सुहास पिपरे,अक्षय भांडेकर,योगीराज सुरजगाडे,योगेश बरसागडे,नवलेश्व वैरागडे,रमेश मेश्राम, मेघराज वसेकर, विजू उरकुडे, मधुकर नैताम, खोजेंद्र सातपुते, आदी बहुसंख्येने ओबीसी युवा वर्ग उपस्थित होते.