व्याहाड (बुज) येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन शुभारंभ.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते,विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून खनिज विकास निधी अंतर्गत वार्ड नंबर २ मध्ये भाऊराव चौधरी ते अनिल गुरनुले ते मुकेश गेडाम यांचे घरापर्यंत ८ लक्ष रू. चे सीसी नालीचे बांधकाम मंजूर झालेले आहे.
त्या कामाचे भूमिपूजन व्याहाड बूज.च्या माजी सरपंच,सौ वंदनाताई गुरनुले यांचे हस्ते संपन्न झाले.
या वेळेस महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावलीचे अध्यक्ष,अनिल गुरनुले,जेष्ठ माळी समाज नेते मारोती गुरनुले, खुशालजी मोहुर्ले,माळी समाज व्याहाड बुज.चे संजय गुरनुले,माजी माळी समाज अध्यक्ष,किशोर लेनगुरे,सेवा सहकारी अध्यक्ष सचिन इंगुलवार,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत संगीडवार,दीपक गद्देवार,नरेंद्र गुरनुले,मोहन मोहुर्ले गंगाधर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.