चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात डॉ.रमेश गजबे किंवा प्रा.राम मडावी मैदानात उतरणार.
★ त्यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : चिमुर - गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी चिमुरचे डॉ.रमेश गजबे मैदानात उतरणार असल्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना घाम फोडणार आहेत हे येणारा काळच सांगेल.
सन २०१९ च्या चिमुर लोकसभा निवडणुकीत ते वंचित (प्रकाश आंबेडकर ) यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे होते त्यामुळे त्यांना बहुजनांच्या मतदारांनी साथ दिल्यामुळे त्यांनी १ लाख ११ हजार मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर होते. कांग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी ७० हजार मतानी पडले. हिच बहुजनांची मते डॉ. उसेंडी यांना मिळाली असती तर डॉ. नामदेव उसेंडी यांचा विजय नक्की होता. परंतु घडले उलटेच डॉ.रमेश गजबे यांना मिळालेली सव्वालाख मते भाजपाचे अशोक नेते यांच्या पथ्यावर पडली
व भाजपाचे अशोक नेते निवडुन आलेत. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित (प्रकाश आंबेडकर )संध्यातरी इंडिआ आघाडी सोबत आहेत. वंचित इंडिआ आघाडी सोबत राहील्यास डॉ. रमेश गजबे हे अपक्ष उमेदवार म्हणुन लढवू शकतात. किंवा वंचित प्रा. राम मडावी शिंदेवाही यांना मैदानात उतरविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. प्रा. राम मडावी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात वंचितचे उमेदवार म्हणुन उभे होते त्यांना १ लाख मते मिळाली होती.उद्या वंचित इंडिआ आघाडीतून बाहेर पडली. संध्यातरी वंचित बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे.
तेव्हा चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी वंचित डॉ. रमेशजी गजबे किंवा प्रा. राम मडावी यांनाच देणार दुसरा पर्यायही नाही. आणि असे जर झाले तर डॉ. रमेश गजबे किंवा प्रा. राम मडावी ची उमेदवारी कांग्रेसच्या उमेदवारांना घाम फोडू शकते. कांग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे रिपब्लिकन पार्टी च्या छोट्या - मोठ्या पार्टीच्या स्थानिक नेत्याच्या संर्पकात आहेत.