रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर लोकसभा निवडणुक लढविणार.

रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर लोकसभा निवडणुक लढविणार. 


मुनिश्वर बोरकर गडचिरोली 


चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर ची बैठक रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपालराव रायपूरे यांच्या अध्यक्षतेखाली विजय लक्ष्मी हाटेल चंद्रपूर येथे पार पडली. सदर बैठकीत असे ठरविण्यात आले की, मविआ रिपब्लिकन पार्टी ला विचारात घेत नसल्यामुळे चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची निवडणुक लढविणे व यात मोरेश्वर चंदखेडे तसेच लाजर कांबळे यापैकी एकाला तिकीट देऊन रिपा पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. 


अमरावती लोकसभेची जागा वंचित लढवित असेल तर रिपाई वंचितला ताकतिनिशी सहकार्य करेल. परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत वंचित दर्यापूर व अमरावती ची उमेदवारी रिपाईला सोडत असेल तरच हे शक्य होईल. अश्या प्रकारची साधक - बाधक चर्चा होवून सदर बैठकीचा ठराव रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय महासचिव डॉ.राजेंद्र गवई यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले. 


सदर बैठकीला गोपाल रायपूरे , शिद्धार्थ सुमन ,लाजर कांबळे , मोरेश्वर चंदनखेडे , उपाध्यक्ष कोमल रामटेके , रामसिंग साहेल ,  तसेच पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर 'शंकर अण्णा सिनेकरपू ,आर.एम.पाटिल,बाजीराव उंदिरवाडे , देवराव जेंगठे,गुरुदास रामटेके,संतोष रामटेके ' आदिची उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !