जगतगुरू तुकोबाराय सा.वाचनालय आणि मराठा सेवा संघाच्या वतीने नंदकिशोर वाढई यांचा सत्कार.

जगतगुरू तुकोबाराय सा.वाचनालय आणि मराठा सेवा संघाच्या वतीने नंदकिशोर वाढई यांचा सत्कार. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा व  मराठा सेवा संघ राजुरा यांच्या वतीने कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा येथे सत्कार करण्यात आला.


नंदकिशोर वाढई हे सरपंच म्हणून उत्तम कार्य करीत आहेत त्यांनी कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत त्यांचे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य हे वाखावण्याजोगे आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करून त्यांच्यावर सरपंच संघटनेची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. 


दुरदृष्टी ठेवून काम करणारे नंदकिशोर वाढई हे जिल्हास्तरावर गावाचा कारभारी असणाऱ्या सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी उत्तम कामगिरी करतील अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा व मराठा सेवा संघ राजुरा नेहमीच सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक काम करणार्‍या लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे.याच हेतूने नवनियुक्त अ. भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांचा सत्कार राजुरा येथे करण्यात आला. 

         

या प्रसंगी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा चे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी,जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा चे संचालक लक्ष्मण घुघुल, मधुकरराव डांगे, वामनराव साळवे, मधुकर मटाले, लक्ष्मण तुराणकर, दिलीप गिरसावळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !