रमाई महिला ब्रिगेड ( पिरिपा) च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
मुनींश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकोलाजिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची विश्राम भवन अकोला येथे दुपारी 2 वाजता जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. रमाई महिला बिगेड च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .बैठकीमध्ये पक्षाचे पुढील निवडणूक विषयक राजकीय धोरण या संदर्भाने व जिल्ह्यात जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने उपस्थित कार्यकर्त्यांना पीआरपी चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष नागसेन शिरसागर उपाध्यक्ष अनिल गवई ,शहराध्यक्ष हिंमत हिवराळे शैलेश वानखडे ,प्रकाश भगत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा बेबीताई राठोड, ज्येष्ठ नेते महादेवराव शिरसाट ,डीएम हाताळकर ,आबा शिरसाट, संजय मनवर, शेख राजिक वाहूरवाघ, राठोड इंगळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.