श्रीनगर व वृंदावन नगरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवा.नगरातील महिलांचे ठाणेदार यांना निवेदन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०४/०३/२४ शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या यातून निर्माण होणाऱ्या अडचणीला तोंड देण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनला अपुऱ्या पोलिस स्टाफ मुळे पोलिसांना सुरक्षा प्रदान करताना दमछाक होतांना दिसते. अशातच उन्हाळा सुरू होताच शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना शहरात दिसून येत आहे.शहरातील श्रीनगर आणि वृंदावन नगर देलन वाडी वॉर्डात मागील पंधरा ते वीस दिवसापासून दररोज सदर नगरात चोऱ्या होत आहेत.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोऱ्यांवर आळा बसावा आणि चोरट्यांना जेरबंद करावे नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी रात्रीला श्रीनगर,वृंदावननगरात,देलनवाडी वॉर्डात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात यावी या मागणीसाठी परिसरातील महिला पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी मध्ये जाऊन मागणीचे निवेदन ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.
ठाणेदार यांच्या वतीने उपस्थित महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.निवेदन देताना दोन्ही नगरातील किमान ५० ते ६० महिला यावेळी उपस्थित होत्या.