माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,११/०३/२०२४ ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर हस्ते यांचे संपन्न झाले.यावेळी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
मौजा -बरडकिन्ही येथे सुरज दोनाडकर ते बौद्ध चौक पर्यंत सि.सि. रोड बांधकाम (जन सुविधा अंतर्गत) १० लाख रुपये, रामचंद्र मेश्राम ते बौद्ध विहारापर्यंत सीसी रोड बांधकाम (गौण खनिज निधी अंतर्गत) २० लाख रुपये ,मौजा -वांद्रा येथे दिलीप आंबोरकर ते मेन रोड पर्यंत सी.सी.नाली बांधकाम (गौण खनिज निधी अंतर्गत) १० लाख रुपये ,मौजा -आक्सापूर येथे वासंती मेश्राम ते पवनपार यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड बांधकाम १५ लाख रुपये, ( गौण खनिज निधी अंतर्गत) मौजा- कोसंबी येथे स्मशानभूमी मध्ये शेडचे बांधकाम करणे (गौण विकास निधी अंतर्गत) ७ लाख रुपये , मौजा-भुज येथे बौद्ध विहार जवळ समाज मंदिराचे बांधकाम (दलित वस्ती सुधार अंतर्गत) ७ लाख रुपये. इ.कामांचे भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर,भाजपा जिल्हा सचिव साकेत भानारकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सालोटकर, भाजपा महामंत्री ज्ञानेश्वर पा. दिवटे, भाजयुमो महामंत्री प्रा.यशवंत आंबोरकर, भाजयुमो महामंत्री इंजिनियर अविनाश मस्के, सरपंच अनिल तिजारे, सोशल मीडिया संयोजक धीरज पाल,विद्यार्थी आघाडी विधानसभा संयोजक तेजस दोनाडकर, प्रफुल्ल सातपुते सदाशिवजी दोनाडकर,विजय हुड,ओमदेव ठाकरे,वासुदेव दोनाडकर,गुलाब राऊत, विलास ढोंगे इ.मान्यवर उपस्थित होते.