बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा. - प्रा.मुनिश्वर बोरकर ★ आपापल्ली बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा.

बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा. - प्रा.मुनिश्वर बोरकर 


★ आपापल्ली बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा. 


एस.के.24 तास


आल्लापल्ली : ब्रम्हदेशात मुळ बौद्धाच्या धम्माची सुरवात झाली यातूनच १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दिक्षाभुमीत लाखो लोकांना धम्माची दिक्षा देऊन खऱ्या अर्थाने धम्मक्रांती घडविली आणि आपण बौद्ध झालोतआता बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा.

आपापल्ली बौद्ध विहारात सांयकाळी महिलांनी तरी एकत्र येऊन त्रिशरण - पंचशिला ग्रहण कराव्यात तरच बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा केल्याचा आनंद मिळेल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी आपापल्ली येथील बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमा प्रसंगी केले.


 आपापल्ली ( अहेरी ) येथील बुद्ध विहारात तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा भन्ते धम्मरक्षीत , भन्ते धम्माकुर , भन्ते अभय , भन्ते गौतम , भन्ते महेंद्र सर्व नागपूर यांच्या उपस्थितीत त्रिशरण - पंचशिला ग्रहण करून विधिवत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. 


दुसऱ्या सत्रातील धम्मदेशना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माजी विस्तार अधिकारी डॉ. गौतम मेश्राम प्रमुख अतिथी रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपालराव रायपूरे , शुशीला भगत , ढोके मॅडम , शकुंतला दुर्गम , अलोणे सर , दुर्गम ' निरंजन दुर्गे ' हनुमंत नैताम , वासुदेव दुर्गे ' रामदास कोडागुर्ले आदि लाभले होते . याप्रसंगी गौतम मेश्राम मार्गदर्शन करतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जी धम्मक्राती घडविली याला जगात तोड नाही. म्हणून आज जगाला युद्ध नको तर बुद्ध हवे असे वाटते. शिक्षणासिवाय तरणोप्पय नाही. शिक्षण हे खरोखरच वाघणीचे दुध आहे. जो प्राशन करीत त्यांचीच प्रगती होईल. 


याप्रसंगी गोपाल रायपूरे ' दुर्गम सर ' शुशीला भगत ,ढोके मॉडम ' निरंजन दुर्गे आदिची भाषणे झालीत. शुशीला भगत हिने बुद्ध मुर्ती दान केल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन झाडे तर आभार दुर्गे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !