आरमोरी च्या प्रसिद्ध कवयित्री,संगीता वाल्मीक रामटेके'पाटील यांच्या ' काव्य संगिता ' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन.

आरमोरी च्या प्रसिद्ध कवयित्री,संगीता वाल्मीक रामटेके'पाटील यांच्या ' काव्य संगिता ' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन.


एस.के.24 तास


गडचिरोली : मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जागतिक मराठी भाषा गौरव दिन' सोहळ्याच्या पहिल्या सत्रात 'मराठीचे शिलेदार' प्रकाशनाच्या १४ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी 'जागर मराठीचा' या कार्यक्रमात मंगळवार, दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी 'राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत', ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.


गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध कवयित्री 'सौ.संगीता वाल्मीक रामटेके पाटील' यांच्या 'काव्यसंगीता' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. पुस्तक प्रकाशनानंतर संस्थेच्या वतीने कवयित्री संगीता रामटेके पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ, जागर मराठीचा विशेषांक, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुमारी तपस्या वाल्मीक रामटेके कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे आणि  कवियत्री श्रीमती सविता धमगाये हे प्रामुख्याने उपस्थित होते.


'जागर मराठीचा' या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व थोर महात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष मा. रमेशजी इंगळे उत्रादकर साहित्यिक व कादंबरीकार, स्वागताध्यक्ष मा. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन, मुख्य आयोजक व व सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र  बुलढाणा मा. नरेश शेळके, प्रमुख अतिथी मा. डॉ. सौ. संगीताताई काळणे पवार, सहसचिव, राजेश्वर एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा,मा. राहुल पाटील अध्यक्ष, संस्थापक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व मा.अरविंद उरकुडे, गडचिरोली विश्वस्त प्रमुख तर प्रमुख पाहुणे मा. डॉ.अण्णासाहेब म्हळसणे, मा.रणजितसिंग राजपूत, मा. शंकर महाराज येळगांवकर, मा.विजय गवारगुरू, मा. रामकृष्ण म्हस्के, मा. डॉ. सौ. विजयाताई काकडे, मा.विजयाताई कोळसे, आ.उर्मिलाताई बाविस्कर, आ.गायत्रीताई सावजी, आ.ज्योतीताई पाटील, आ.ज्योतीताई खेडेकर, आ.लक्ष्मीताई शेळके याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.


'जागर मराठीचा' समारंभात राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १८ शिक्षक, शिक्षिका यांना यावर्षीचा 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन त्यांचा कौटुंबीक सत्कार करण्यात आला. सोबतच विविध कार्यक्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घालून प्रेरणादायी तसेच उल्लेखनीय कार्य करणा-या ४ जणांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बहारदार समारंभाचे सूत्र संचालन कार्यकारी संपादक सविता पाटील ठाकरे, सिलवासा यांनी केले.


तर आभार प्रशांत ठाकरे, सिलवासा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन भिवसनकर, वैशाली अंड्रस्कर, तारका रूखमोडे, कल्पना भिवसनकर, सुधा मेश्राम, संग्राम कुमठेकर, किशोर कुमार बनसोड, विष्णू संकपाळ, प्रशांत ठाकरे, सविता पाटील व ग्रिष्मा भिवसनकर यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमास राज्यातील शिक्षक गण,साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !