कळमना येथे जागतिक महिला दिन व उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांचा वाढदिवस उत्साहात.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रेरणा ग्रामसंघ कळमना यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांचा १० मार्च ला असणारा वाढदिवसही यानिमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजकांकडून श्री. व सौ. वाढई यांचा पुस्तक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की महिलांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी महिला महोत्सव आयोजित होणे गरजेचे आहे. आज महिला आत्मनिर्भर, सक्षम , निर्भीड बनत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी निलेश वाढई तंटामुक्ती अध्यक्ष, उपसरपंच कौशल्या कावळे, रंजना पिंगे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्राम पंचायत सदस्य, आशा नंदकिशोर वाढई, उमेद च्या हजारे मॅडम, ग्राम पंचायत सदस्य सुनिता उमाटे, श्रावण गेडाम उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, राजु पिंपळशेंडे
माजी सरपंच धोपटाला, रामचंद्र कुकुडे, शिला बोढे, जेष्ठ महिला मिराबाई वाढई, प्रेरणा ग्रामसंघाच्या अध्यक्षा मिना भोयर, कार्याध्यक्षा वैशाली आस्वले, मुख्यधापिका दुधे मडम, गौखरे मॅडम, पेंदोर सर, उमरे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुचिता धांडे, संगिता उमाटे, शारदा वाढरे, गीता वाढई, मंदा गेडाम , पुष्पा बोढाले, मंजुषा आंबिलकर, कल्पना क्षिरसागर, मनीषा धांडे बचत गटाच्या महिला व समस्त गावकर्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिना भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोखरे मॅडम यांनी मानले.