२४ मेंढ्या ठार ७ गायब हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात.

२४ मेंढ्या ठार ७ गायब हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात.


एस.के.24 तास


सांगली : शेत खतविण्यासाठी बसवलेल्या शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हिंस्त्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.या हल्ल्यात ५ शेळ्या जखमी झाल्या असून हिंस्त्र प्राण्यांनी ७ मेंढ्या गायब केल्या आहेत.पलूस तालुक्यातील कृष्णा काठावरील भिलवडी येथे ही घटना घडली.


महावीरनगर रस्त्यावरील चौगुले यांच्या शेतात मोहन हराळे यांचा ३०० शेळी मेंढीचा कळप महिन्या पासून रान खतवण्यासाठी वस्तीला आहे.पहाटे तीनच्या सुमारास कुत्री व मे़ढ्यांच्या आवाजाने जाग आल्या नंतर हराळे यांना हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले.


मेंढ्यांच्या नरडे व पोटावर हल्ले झाले होते.यामुळे २४ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.या हल्ल्याची माहिती मिळताच वन व पशूसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !