आरोग्य उपसंचालक डॉ.शंभरकर यांची ग्रामीण रुग्णालयास भेट.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,०३ /०३/२४ पोलिओचे निर्मूलन व्हावे यासाठी राज्यात सर्वत्र पोलिओ डोस लसीकरण मोहीम राबविल्या जात आहे.यासाठी आरोग्य विभाग जागो जागी लसीकरण केंद्र उभारून बालकांना पोलिओ चे डोज पाजत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या कार्याची अंमलबजावणी योग्य रित्या होत आहे किंवा नाही यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा उपसंचालक आरोग्य विभाग डॉ.शशिकांत शंभरकर AIDS ,DHS मुंबई यांनी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली व उपस्थित बालकांना पोलिओचे डोज पाजले.
या वेळेस डॉ.बंडू रामटेके जिल्हा स्तरीय नोडल अधिकारी चंद्रपूर,डॉ.विलास दुधपचारे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.निखिल डोकरिमारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,डॉ.प्रीतम खंडाळे,श्रीकांत नागमोती,डॉ.श्रीकांत कामडी तसेच रुग्णालयातील इतर नर्स व कर्मचारी उपस्थित होते.