कवी : - नागोराव सोनकुसरे |
चंद्रावर चे भूखंड भारताच्या मोहिमेला,माझा प्रथम प्रणाम.
एस.के.24 तास
चंद्रावर चे भूखंड
भारताच्या मोहिमेला,
माझा प्रथम प्रणाम.
शोध घेण्या चंद्रावर,
प्रयत्नाला त्या सलाम.
चंद्रावर शोधायला,
शोधू अनेक भूखंड.
प्लॉट काढू विकायला,
मिळे खावया श्रीखंड.
जाहिरात दिली आज,
आले अंबानी धावून.
सर्व प्लॉट घेतो म्हणे,
देतो पैसे मी मोजून.
आले ग्राहक बरेच,
भाव दिले वाढवून.
चंद्रावर चे भूकंड,
गेले सर्वच विकून.
शोध माझा घेण्यास्तव,
भूमाफिया समजून.
केला वापर ईडीचा,
नाही गेलो घाबरून.
दिली लाच त्या ईडीला,
गेला तोही समजून
मंत्री सर्व भेटलेत,
कार्य माझे ते पाहून.
कवी : - नागोराव सोनकुसरे ६४९नवीन नंदनवन नागपूर. भ्रमणध्वनी क्र. ९१४६५७५७२०