काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान २७ ला नामांकन अर्ज दाखल करणार.
एस.के.24 तास
गडचिरोली : इंडिआ आघाडी मधुन चिमुर - गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते इंडिया आघाडीतील सर्व पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत दि.२७ मार्च ला आपला नामांकन अर्ज जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयात दाखल करणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,महेंद्र ब्रामणवाडे यांनी माहीती दिली.
डॉ.नामदेवरात किरसान हे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अधिकारी या पदावर कार्यरत होते.त्यांनी नोकरीचा राजीनाम देऊन काँग्रेस मधे प्रवेश केला होता.ते गोंदिया जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
गेल्या १० वर्षापासून ते चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी काँग्रेस मोर्चा,निदर्शने,मेळावा यात सक्रिय सहभाग दर्शविला आहे.
चिमुर डोगरगड ते सिरोंचा पर्यत सतत नाटक - दंडारी च्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवत लोकांची मने जिंकली व चिमुर क्षेत्रात लोकप्रिय झालेत त्यांच्या कार्याची दखल घेत कॉग्रेस त्यांना चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी देऊन विरोधकाला तगडी फाइट देणार असल्याचे बोलल्या जात आहे.
दि.२७ मार्च ला त्यांची रॅली अभिनय लॉन मधुन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यात आहेत.