विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या कृषी क्षेत्रातील संधी.

विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या कृषी क्षेत्रातील संधी.


रोशन बोरकर - सावली


सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर येथील ऍग्रो फोरमच्या वतीने समर्थ कृषी पर्यटन विरई ता. मूल येथे भेट देऊन कृषी क्षेत्रातील संधी जाणून घेतले. 


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ऍग्रो फोरमचे समन्वयक प्रा.प्रशांत वासाडे, डॉ.सचिन चौधरी, डॉ. रामचंद्र वासेकर,डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनी विद्यार्थ्यासह समर्थ कृषी पर्यटन केंद्र विरई येथे भेट दिली. यावेळी माननीय सुमित समर्थ यांनी फळबाग लागवड, आधुनिक शेती, कृषी पर्यटन व कृषीपुरक व्यवसाय याबद्दलची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.


जवळपास 30 एकर मध्ये असलेल्या या ऍग्रो फॉर्ममध्ये आधुनिक शेतीच्या माध्यमातून फळबाग, कृषी पूरक व्यवसाय याचा अतिशय सुंदर मॉडेल सुमितजी समर्थ यांनी निर्माण केलेला आहे. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !