बेलगाटा रेल्वे फाटक च्या समोर ब्रेकर वर दुचाकी वरून पडून महिला जखमी.
मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी राजोली
मुल : आज दिनांक,08/03/2024 सकाळी 7 : 30 वा. दरम्यान सौ रेखा विलास धारणे वय,55 वर्ष राहणार चिंधीचक तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर मुलगा निशांत विलास धारणे वय,28 हे दोघे चिंधीच करून चंद्रपूर ला काही कामा निमित्त जात होते.
डोंगरगाव ते बेलगाटा रेल्वे फाटक ब्रेकर वर दुचाकी उसळल्याने गाडी वरून पडून महिला जखमी झाली.मुलगा सुखरूप आहे मोबाईल ने राजोली येथील मित्रांना कॉल करून संपर्क साधला मित्र पोहचून दुचाकीने बसवून उपकेंद्र,राजोली येथे भरती करण्यात आले.
त्यानंतर तेथून रेफर करून सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.राजोली चे माजी तंटामुक्त अध्यक्ष, श्याम पेशेट्टीवार,छोटू भाऊ झोडे,राहुल सिडाम,एस.के.24 तास चे प्रतिनिधी,मंगेश सोनटक्के यांनी मदत केली.