बसपाचे प्रा.योगेश गोणाडे चिमुर लोकसभा मैदानात.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : चिमुर - गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे बसपाचे उमेदवार प्रा. योगेश गोणाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रा. गोणाडे म्हणाले की बसपा देशात तिसऱ्या नंबरची पार्टी आहे.माजी मुख्यमंत्री मायावती यांना देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे . बहुजनाची ताकद प्रा.गोणाडे यांच्या पाठीसी आहे. आता मतदारांनी जागृत राहुन बसपाला साथ घ्यावी असे आवाहनही प्रा.गोणाडे यांनी केले.
प्रा.गोणाडे यांचे उमेदवारी अर्ज सादर करताना प्रदेश कोषाध्यक्ष खाबाडकर ' रामराव नन्नावरे , लोकसभा इन्चार्ज चागदेव शेन्डे , बसपा उपाध्यक्ष धारणे सर . बसपा कोषाध्यक्ष अनिल साखरे ' बसपा प्रभारी गणपत तावाडे , जिल्हा प्रभारी प्रदिप खोब्रागडे ' सुनिल वालदे , मायाताई मोहुर्ले , वेणुताई खोब्रागडे' सोनटक्के आरमोरी ' नरेश महाडोळे ' प्रा. केशव भालेराव,हेमंत रामटेके ' गोरडवार , लिगायत , बारसागडे आदि सहीत बसपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.