" नारी शक्ती वंदन अभियान " पूर्ण ताकतीने यशस्वी करा. - माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०२/०३/२४ देशाचे यशस्वी तथा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या वाटचालीचा एक भाग "नारीशक्ती वंदन अभियान" आहे. महिला सक्षमीकरणाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवणाऱ्या नारीशक्ती वंदन अभियानामुळे भारताने जणू भरारीच घेतली आहे.हे अभियान आपल्याला पूर्ण ताकतीने यशस्वी करावयाचेच आहे आणि नरेंद्र मोदी महिलांसाठी करीत असलेल्या कार्यांची माहिती जनसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचे कार्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेने करावयाचे आहे.असे संबोधन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या रुई या गावात भाजपाचे ज्येष्ठ नेते,निरूपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गोकुळ बालपांडे यांचे निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.दि.५ मार्च रोजी दु. ३ वाजता नारीशक्ती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या अभियानाला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे कर्तव्यतत्पर खासदार अशोक नेते उपस्थित राहणार असून महिलांची मोठ्या संख्येनी उपस्थिती असावी.अशा सुचना देखील अतुलभाऊ देशकर यांनी केली.
या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.गोकुळ बालपांडे, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर,सौ.सुरेखा बालपांडे,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर,महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे,सरपंच हेमंत ठाकरे, उपसरपंच ताराचंद पारधी, मनोज मैंद,विठोबा शामराव बुराडे, देवराव भुते,उपसरपंच सदाशिव ठाकरे,उपसरपंच गोपाल ठाकरे, माजी उपसरपंच देविदास कार, माजी सरपंच विजय हुड,सरपंच उमेश घुले,उपसरपंच देवराव नन्नावरे, सौ. कविताताई राहाटे सदस्या संजय गांधी निराधार योजना, सुजीत बालपांडे माजी सरपंच,सौ.लताबाई दिगांबर नाकतोडे, सौ.कविता यादव चौधरी,सौ. संगीता भास्कर नाकतोडे इ. मान्यवरांसह ३९ कार्यकर्ते उपस्थित होते.