जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.

जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,१६ मार्च २०२४ तालुक्यातील मौजा.जिबगांव येथे दोन कॅन्सरग्रस्त रुग्णांना राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कर्करोग, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तसेच इतर रुग्णांना विविध प्रसंगी आर्थिक मदत देणे सुरू ठेवले आहे,त्यांचे जनसेवा हिच ईश्वर सेवेचे व्रत सर्वांना प्रेरणादायी आहेत विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही नागरिक असो विजय वडेट्टीवार त्यांना नेहमी सहकार्य करतात त्याच माध्यमातून जिबगांव येथिल कॅन्सरग्रस्त रुग्ण सौ.मालताबाई शेंडे वय ५६ वर्षे व शारदाताई बारसागडे वय ३४ वर्षे यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत देण्यात आली.


सविस्तर वृत्त असे की, सौ.मालताबाई शेंडे व शारदाताई बारसागडे हे दोन्ही रुग्ण राहणार जिबगांव अत्यंत गरिब कुटुंबातील व्यक्ती आहेत मागील बऱ्याच दिवसापासून प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्राथमिक उपचार घेत होते, उपचारा दरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. स्व.शारदाताई बारसागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सौ.मालताबाई शेंडे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाहिजे असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली,त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.


आर्थिक मदत देताना जिबगावचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी,उपसरपंच सौ.मोनीताई उंदीरवाडे,ग्रामपंचायत सदस्या सौ.इंदिरा भोयर,सौ.लिलाबाई भोयर,सौ.दिक्षाताई भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !