★ मुल न.प.ला ६.२५ कोटी मंजूर.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्राचे आमदार तथा पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुगंटीवार यांचे प्रयत्नातून मुल न.प.ला ६ काेटी २५ लक्ष रूपये मंजुर झालेले आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सदर निधी मिळणार असून यातून इतर कामांसाेबत शहरातील विविध रस्ते व सिमेंट कांकीट रस्ते बनविण्यात येणार असल्याने आता तरी १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या व आत्ता नगरविकासाचे आराखडयातुन इतिहासजमा झालेल्या या शहरातील सिमेंट कांकिट रस्त्याचे भाग्य खुलवून अशा रस्त्यावरील रहिवासी यांना दिलासा देऊन वशिष्ठ पूर्ण काम न.प.प्रशाशकीय यंत्रणा करेल अशी जनतेची अपेक्षा आहे.
मुल न.प. अंतर्गत २० वर्षाआधी काही सिमेंट चे रस्ते बनविण्यात आले.विशेष म्हणजे यात चंद्रपूर महामार्गावरील वॉर्ड १५ मधील प्रा.महेश पानसे यांचे घरापासून तर तिवाडे यांचे घरापर्यन्तचा मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढल्यापासुन जागोजागी फुटला असून १ते २ फुटानी खाली गेलेला आहे. गत २ वषॉआधी पावसाळ्यात इथे अनेक घरामध्ये दाेनदा पाणी घुसून नागरिकांना मोठा त्रास सहण करावा लागला हाेता हे विशेष.
मुल न.प.अंतर्गत रस्ते बांधकामे सा.बा.विभगमार्फत होत असली तरी मात्र न.प.प्रशाशनाने सदर रस्त्याची उंची वाढविण्याकरिता तसा प्रस्ताव दिल्यास जनतेच्या भल्याचे एक वैशिष्टपुणँ काम हाेईल असे परिसरातील जनतेची विनंतीवजा मागणी आहे.
मुल न.प.चे क्रियाशिल मुख्याधिकारी यांना या मार्गाची अवदशा ज्ञात असून त्यांनी सकारात्मकतेने सा.बा. विभागाकडुन प्रस्ताव देऊन या मार्गावरील जनतेला दिलासा दयावा अशी अपेक्षा आहे.