आपत्ती व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांनी सदैव सज्ज असावे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा प्रा.जी.एन.केलांचे प्रतिपादन.

आपत्ती व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांनी सदैव सज्ज असावे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा प्रा.जी.एन.केलांचे प्रतिपादन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी :१९ मार्च २४ " नैसर्गिक संकट किंवा मानवनिर्मित आपत्ती माणसावर कधी ओढावेल काही सांगता येत नाही.आपल्याला,आग लागली,भूकंप आला,पूर चढला अशा घटना वारंवार ऐकायला येतात.अशावेळी तातडीने उपाययोजना केली तर अनेकांचे जीव आपण वाचवू शकतो,यासाठी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांनी सदैव सज्ज असावे " असे महत्वपूर्ण प्रतिपादन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा.जी.एन.केलांनी केले.ते आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.कार्यक्रम संस्था सचिव मा.अशोक भैयांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

       

या कार्यशाळेचे उद् घाटन प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी केले.विचारपिठावर प्रशिक्षक डॉ नितीन गुल्हाणे, उपप्राचार्य व संयोजक डॉ सुभाष शेकोकर, प्राचार्य डॉ वरभे,प्रा विनोद नरड, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम इ.मान्यवर उपस्थित होते.डाॅ नितीन गुल्हाणेंनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले तर डॉ राजू आदेंनी ' आपत्ती व्यवस्थापन व विद्यार्थ्यांची भूमिका,प्रा विनोद नरड यांनी आग व पाणी संकटावर मात,या विषयावर आपली मते मांडली.इतर पाहूण्यांनीही मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी सभोवतालच्या इतर महाविद्यालयातून विद्यार्थी आले होते.

       

कार्यशाळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ सुभाष शेकोकर,संचालन डॉ प्रकाश वट्टी तर आभार डॉ आशिष साखरकरांनी मानले.यशस्वीतेसाठी संजू मेश्राम, डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते,प्रा जयेश हजारे, डॉ कुलजित शर्मा, डॉ अजित खाजगीवाले इ.नी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !