ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा.

ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा.


एस.के.24 तास


गडचिरोली : ओबीसींची जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचे बांधकाम  जिल्ह्यातील ओबीसींच्या कमी झालेले आरक्षण इत्यादी मागण्याकरिता ओबीसी युवा समाज संघटना गडचिरोली कडून दिनांक ४ मार्च पासून साखळी उपोषण सुरु आहे वरील सर्व मागण्या रास्त असून त्या मंजुरीकरिता शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 


परंतु केंद्र व राज्य सरकार वरील मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने आपल्या जाहीरनाम्यात ओबीसीची जातनिहाय जनगणना, ओबीसीसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय, या प्रमुख मागण्यासह दहा मागण्या समाविष्ट केलेल्या आहेत. या निमित्ताने केंद्र  व राज्य शासनाला विनंती आहे की, ओबीसी युवकांचा पुन्हा अधिक अंत न पाहता त्यांच्या रास्त मागण्या तात्काळ मंजूर कराव्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी,जि.प.माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा.नाट,युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड.विश्व्जीत कोवासे,ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार


शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, शंकरराव सालोटकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष अपर्णाताई राऊत, पुरुषोत्तम बावणे, आकाश निकोडे  सोनालीताई नागापुरे, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, तेजस मडावी, जितेंद्र मुनघाटे, सुरेश भांडेकर, चारुदत्त पोहने, कपिल पेंदाम , उत्तम ठाकरे, जावेद खान सह इतर काँग्रेस पदाधिकारी सह राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पदम भुरसे, प्रफुल आंबोरकर सह मोठ्या संख्येने उपोषणकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !