वंचितांचे प्रा.हितेंद्र मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
वंचितचा उमेदवार कोणाच्या पथ्यावर पडणार ?.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीआपले स्वतंत्र उमेदवार जाहीर करुन चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्रासाठी शिंदेवाही येथील प्रा. हितेंद्र मडावी यांना उमेदवारी दिल्यामुळे वंचितने हजारो कार्यकर्त्याच्या साक्षीने रॉली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागील लोकसभा निवडणुकीत वंचितचे डॉ.रमेश गजभे यांनी १ लाख ११ हजार मते घेऊन कांग्रेसच्या उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना पराभव पत्कारावा लागला. प्रा. हितेंद्र मडावी यांची उमेदवारी सुद्धा कांग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसते. चिमुर क्षेत्राचा विकास होणे महत्वाचे आहे. वंचितला कांग्रेस आणि भाजपा एकाच माळेचे मणी दिसतात तेव्हा आतातरी बहुजनांनी , रिपब्लिकन पार्टी च्या विविध गटानी वंचित च्या उमेदवारांना सहकार्य करून मला लोकसभेत पाठवा असे वंचितचे उमेदवार प्रा. हितेंद्र मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
याप्रसंगी गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्इ, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे यांचेही भाषणे झालीत. उमेदवारी अर्ज भरतांना वंचितचे तालुका अध्यक्ष बाकीत शेख , महिला अध्यक्ष प्रज्ञा निमगडे , माला भसगवळी , शहर अध्यक्ष दिलीप बांबोळे , उपाध्यक्ष हजारे, महासचिद देवानंद दुर्गे , सघटक धर्मेद्र गोवर्धन , उपाध्यक्ष केळझरकर , तालुका अध्यक्ष जावेद शेख विपिल सुर्यवन्सी ' मडावी , बन्सोड लाखांदूर , गजभीचे कोरची,दुर्गे चामोर्शी , उदि रवाडे धानोरा,आदि सहीत वंचितचे हजारो कार्यकर्त उपस्थित होते .'