सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न.
★ विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :- १६ मार्च २०२४ शहरातील सावली बस स्थानक येथील सुरक्षा भिंत, फेवर ब्लँक,आणी काँक्रीट आदी विकास कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून १ कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी चंद्रपूर जिल्हा बस स्थानक आगाराचे अभियंता मा.मोडक साहेब, आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.प्रितम गेडाम,नगरसेविका सौ.साधनाताई वाढई, सौ.ज्योतीताई शिंदे,सौ.ज्योतीताई गेडाम,सौ.अंजलीताई देवगडे,सामाजिक कार्यकर्ता मा.हिरालाल घडसे,मा.आकाश खोब्रागडे, कंत्राटदार मा.अक्षय चौधरी,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सावली बस स्थानक आगार प्रमुख मा.नैताम,मा.सुदाम निकोडे आदी उपस्थित होते.