ने.हि.महाविद्यालयाच्या सचिन राऊत चा गोंडवाना विद्यापीठातर्फे गौरव.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१४/०३/२०२४ ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचा एम.ए.अर्थशास्त्र प्रथम वर्षाचा विद्यार्थी सचिन राऊत याने नुकतेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पार पडलेल्या झाडीबोली नाटयसंमेलनातील ' पथनाटय अभिनय ' स्पर्धेत 'शेतकरी ' पथनाटय सादर करुन तृतिय क्रमांक पटकाविला.
त्याला विद्यापिठाचे प्र - कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, संमेलनाध्यक्ष डॉ श्याम मोहरकर,परिक्षक डॉ परमानंद बावनकुळे, एकांकिका परिक्षक डॉ धनराज खानोरकर, युवराज प्रधान व डॉ नरवाडेंच्या उपस्थितीत रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पथनाटयाची तयारी सचिनने विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकरांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे,उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.पद्माकर वानखडे,विद्यार्थीपरिषद सचिव कु.स्वाती धनविजयने सचिनचे भरभरुन कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला.