छायाचित्रकारांच्या वतीने पाथरी येथे कार्यशाळेचे आयोजन.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील पाथरी येथील असोला मेंढा तलावाचा निसर्गरम्य ठिकाण छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर संलग्नित तालुका छायाचित्रकार संघटना सावली तसेच तालुका छायाचित्रकार संघटना सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार रोजी करण्यात आले यामध्ये मार्गदर्शन म्हणून गंगा भेंडारकर यांनी फोटोशॉप मधील विविध विषयातील नवीन टेक्नॉलॉजी संबंधित प्रात्यक्षिक करून छायाचित्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच विपीन राऊत यांनी छायाचित्रकारांच्या येणाऱ्या अडचणीवर मात करून आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांना सावली व सिंदेवाही यांच्या वतीने सन्मानचिन्ह भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले तर या कार्यक्रमास्थळी प्रमुख अतिथी म्हणून छायाचित्रकार बहुद्देशीय संस्थाचे अध्यक्ष,फुलचंद मेश्राम संस्थापकअध्यक्ष,नितीन रायपुरे, विनोद बांगरे,प्रविण द्विवेदी,
सुजीत भसारकर, मुकुंदा गव्हारे,आकाशकांत सहारे, विजय गोंगले,प्रकाश चिंतलवार,धनेश वंजारी,तेजस डोंगरे,अंकुश रामटेके आणि सावली व सिंदेवाही येथील छायाचित्रकार बहुसंख्येने उपस्थित होते तर आभारप्रदर्शन दिनेश गोवर्धन यांनी मानले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व छायाचित्रकार बंधूंचे मोलाचे सहकार्य लाभले.