छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल ; गाळे लिलावाची मुल न.प.तर्फे जय्यत तयारी.

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल ; गाळे लिलावाची मुल न.प.तर्फे जय्यत तयारी. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : नगरपरिषद मुल तर्फे ५६ गाळे असलेले दोन मजली भव्य व्यापारी संकुलाचे बांधकाम सा.बा.विभागाचे अखत्यारीत पूर्ण करण्यात येऊन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत "छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले आहे.


लोकसभा निवडणुक आचार संहिता लक्षात घेऊन न.प.मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी पुढाकार घेऊन शहरातील छोटया उदयोजकांनी या संकुलाचा लाभ ध्यावा या उद्धेशाने युद्धस्तरावर सदर गाळे विक्रीचा कार्यक्रम तयार केला असून दि.४ मार्च ते १४ मार्च पावतो सदर लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या दुष्टीने संपुर्ण  शहरात भव्य प्रसिद्धी सुरु आहे.पत्रके,शोशल मिडीया,वुत्तपत्रे,पत्रके यातून प्रसिद्धी सुरू आहे. 


सदर प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची सोय होण्यासाठी, विविध दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. दिनांक 9 मार्च 2023 रोजी सुद्धा नगरपरिषद कार्यालय कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.सदर ५६ गाळे लिलावात पारदर्शकता रहावी व नियमानुसार लिलाव प्रक्रिया पार पडावी याकरीता आॉनलाईन ई लिलाव होणार असून ठराविक रोष्टर नुसार गरजूंना सदर गाळे लिलावात  मिळावेत याकरीता जास्तीतजास्त  संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे.


असे आवाहन न.प.प्रशासन,प्रशासक,मुख्याधिकारी यानी केले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !