ख्रिस्तानंद चौकात ऑटो युनियन संघटनेच्या वतीने महाप्रसादचे वितरण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०३/२४ विदर्भ सहा सिटर ऑटो युनियन संघटना ब्रह्मपुरी, नागभीड तसेच विदर्भ ऑटो असोसिएशन व ख्रिस्तानंद चौकातील मित्र परिवार ब्रम्हपुरीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला .
महाप्रसाद वितरण सोहळ्याचे उद्घाटक प्रकाशजी कावळे उपनिरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी अध्यक्ष गोवर्धन दोनाडकर पत्रकार ब्रम्हपुरी, प्रमूख अतिथी अजय नागोसे म.पो, ट्राफिक पोलीस राहुल लाखे,पत्रकार नंदुभाऊ गुद्देवार, रुपेश देशमुख, हिराभाऊ मेश्राम, हरीशजी सोरते, सुधाकर दिवटे आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले .
विदर्भ सहा सिटर ऑटो यूनियन संघटना ख्रिस्तानंद चौकात दरवर्षी महाशिवरात्री यात्रे निमित्याने महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेतला जातो. सदर महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी महाशिवरात्री निमित्याने मोलाचे मार्गदर्शन केले आणि, ब्रह्मपुरी येथील सर्व संघटनेच्या लोकांचे अभिनंदन करून कौतून केलें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन व आभार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी मेश्राम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता संघटनेचे कृष्णाजी नागोसे, लेखानंद मेश्राम ,महेश गोटेफोडे, प्रदीप अंडेटीवार ,सुभाष सोरते, विशाल मेश्राम, रफिक सैय्यद,संपत मेश्राम ,सुरेश मुळे,आशीफ शेख,रुपेश डोंमळे, जगदीश नागापुरे ,महेश जांभुळे, सुनील गायधने, धनराज मानकर ,देवा अमृतकर, मदनगोपाल नागोसे, प्रदीप धोंगडे, रफिक शेख, दीपक भोले व संदिप माकडे, दिलीप खेकडे, ख्रिस्तानंद चौकतील मित्र परिवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.