मुल मधील वेगवेगळया नागरी समस्या बाबत मुख्याधिकारी यशवंत पवार यांना निवेदन व चर्चा.

मुल मधील वेगवेगळया नागरी समस्या बाबत मुख्याधिकारी यशवंत पवार यांना निवेदन व चर्चा.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : शहरातील विविध समस्यांना घेवून ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुल तालुका शाखा मूल च्या वतीने मूल नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यशवंत पवार यांना निवेदन देवून समस्या विषयी साधकबाधक चर्चा व यशस्वी  चर्चा  करण्यात आली. या निमित्याने मूल शहरातील अर्धवट राहिलेले रस्ता व नाल्यांचे बाधकाम तातडीने पूर्ण करणे , मुल शहरांचे सौदर्य वाढविण्यासाठी तयार केलेले कांरजे सध्या बंद स्थितीत आहेत ते तातडीने दुरूस्त करणे,मुल शहरातील सांडपाण्याचा निचारा होण्या-या नाल्या तूंबून गेल्यामूळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने तातडीने नाल्याची सफाई करणे. 


 मूल शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक समान दाबाने होणे बाबत तसेच शहरात मुत्रीघर बांधकाम करणे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याबरोबर अर्धवट राहीलेले कामे मुत्रीघर,सौंदर्यसाधणे,यांची दुरूस्ती व बांधकामे निश्चीतच वेळेत पूर्ण करण्यावत प्रशासनाचा भर राहील. आणि आम्ही पाणीपूरवठा बाबत तातडीने कार्यवाही करून आणि मिटरची जोडणी करून पाणीपुरवठा सुयोग्य  पध्दतीने होईल यासाठी नगरप्रशासन तातडीने कार्यवाही करेल. 


असे आश्वासन मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या शिष्टमंडळाला आज दिले. या शिष्टमंडळात दिपक देशपांडे,परशूराम शेंन्डे,तुळशिराम बांगर,रमेश डांगे,प्रमोद मशाखेत्री,बादल करपे,राहूल आगडे,गणेश आकेवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !