वर्धा जिल्ह्यात 311 शाळा मध्ये स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण.

वर्धा जिल्ह्यात 311 शाळा मध्ये स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण.


एस.के.24 तास


वर्धा : स्वयंसिद्धा स्वसंरक्षण उपक्रमा  मार्फत वर्धा जिल्ह्यत 311 जि.प. शाळा मध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरु आहे. विद्यार्थिनींना स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण देवुन त्याना मानसिकदृष्ट्या व शारीरिक द्रुष्ट्या मजबूत बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 


समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जिवन कौशल्य प्रशिक्षण मार्फत १ जाने ते 23 मार्च पर्यंत उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देवुन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात येत आहे. 


संकटाच्या व असुरक्षितेच्या वेळ स्वत:चे रक्षण स्वत: करणे व कुटल्याही परिस्थीतीचा सामना करन्यासाठी  विद्यार्थीनींना स्वयम कौशल्य पारंगत करने,त्यांच्यमध्ये आत्मविश्वास व जागरुकता विकासित करणे यासाठी विद्यार्थीनींना शाळेत प्रात्यक्षिक च्या मध्यमातुन माहिती व कराटे प्रशिक्षण देन्यात येत आहे. 


वर्धा जिल्हा मा.श्री.जगताप साहेब (शिक्षणाधिकारी) जि.प.वर्धा,स्वयंसिद्धा जिल्हा प्रमुख मा.सौ.वैशाली बालपांडे (स्वयंसिद्धा प्रशिक्षक) तसेच मा.सौ.कल्याणी भोंगाडे वर्धा, मा.सौ.गीता लसुंते,मा.श्री.सलीम सर आर्वी,मा. निलेश घाटवाडे सर आष्टी,मा.श्री.मंगेश भोंगाडे सर सेलू,मा.श्री.पिंटू सावरकर सर कारंजा,मा. श्री. गोपी कोतेवार सर हिंगणघाट,मा.श्री. संजय खंडारकर सर देवळी,तसेच कराटे प्रशिक्षक या आत्मरक्षा संरक्षणाचे धडे देत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !