जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसूर्ला येथे 28 फेब्रुवारी ला राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दिनांक 28 फेब्रुवारीला " राष्ट्रीय विज्ञान दिवसा निमित्त " शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.25 विद्यार्थ्यानी गटांनी आपले प्रयोग सादर केले.कार्यक्रमास सरपंच सौ . शारदाताई येनुरकर,श्री विनोदभाऊ कावळे, अध्यक्ष शाळा व्य.समिती,श्री.तकिभाऊ शेख तसेच इतर सदस्यगण उपस्थीत होते.विद्यार्थ्यानी दैनंदिन जीवनात विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित व्हावे असे मनोगत प्रमुख अतिथीनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक श्री.टिकले मुख्याध्यापक,श्री दुधे सर,श्री.श्रीगुरवार सर,श्री.चौधरी सर,श्री.प्रशांत कवासे सर,स्मिता सायरे मॅडम,शीतल धकाते मॅडम शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यानी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन आरुषी आवळे वर्ग 6वा, तर आभार प्रदर्शन शीतल सोपणकर वर्ग 6 वा या विद्यार्थिनींनी केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नवनीत कंदालवार सर यांनी केले.