महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) विद्यालयातील विद्यार्थ्यांची NMMS परीक्षेत उंच भरारी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,११/०२/२४ महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) ता.ब्रह्मपुरी जि. चंद्रपुर येथील सत्र 2023 -24 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग 8 मधिल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां करिता घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत विद्यालयातील 10 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन दरवर्षीची यशाची परंपरा कायम ठेवली यशामध्ये उत्तुंग भरारी मारली.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत माधव सेलोकर ,चैतन्य प्रभू कुथे ,कुमारी सानिया शंकर नखाते ,कुमारी सुरक्षा संतोष शेबे, कुमारी हिमानी श्रीकृष्ण मिसार, कुमारी मनस्वी गुलाब बनकर, कुमारी उर्वशी दीपक इंदूरकर ,कुमारी हसीना ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज हेमराज कामडी, श्रीकांत प्रकाश सहारे, हे विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता परीक्षेच्या माध्यमातून दाखवून स्कॉलरशिप मिळविण्याची उत्तम संधी या परीक्षेमुळे प्राप्त होते जेणेकरून त्यांच्या भविष्यातील शिक्षणास हातभार लावला जाईल. विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर, मार्गदर्शक शिक्षक श्री पुरी सर, श्री मस्के सर ,श्री महाले सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.