EVM हटाव च्या विरोधात महिलांचा जनआक्रोश मोर्चा.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/०२/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपाक आम्ही भारतीय लोक या नात्याने लोकशाहीला मारक आणि घातक स्वरूपाच्या निवडणूक प्रकियेला विरोध करून मशीन द्वारे EVM मुळे होणाऱ्या पक्षपाती निवडणूक प्रक्रियेचा जाहीर निषेध करून लोकशाही भिमुख मतदान व्हावे व निपक्षपातीपणे देश चालविणारे प्रतिनिधी निवडून जावेत व देशातील सामान्य उमेदवारांना सुद्धा देशाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी आणि भारतीय नागरिक म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यातील समस्त EVM हटाव महिला आंदोलन समिती द्वारे EVM हटाव संविधान बचाव तसेच भारतीय निवडणूक प्रक्रिया EVM मशीनचा वापर बंद करून मतदान बायलेट पेपर वर घेण्यात यावे यामागणी साठी जन आक्रोश मोर्चा काल दिनांक २३ फेब्रु.२४ ला काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथून करण्यात आली.त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगे बाबा,तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली मोर्चा हुतात्मा स्मारक ,सम्राट अशोक चौक रेणुकामाता चौक, मर्दानअली चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवडणूक आयोगाचा निषेध असो,EVM हटाओ लोकशाही बचाव,संविधान बचाओ बायलेट्ट वर मतदान घावे असे घोषणाबाजी करीत मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळेस EVM हटाव महिला आंदोलन समितीच्या सुकेशनी बन्सोड,किरण मेश्राम ,निर्लता बन्सोड ,साधना रामटेके ,वैशाली रामटेके ,शारदा घोरमोडे , अर्चना गणवीर ,सरिता धाकडे करुणा मेश्राम, पुनम घोनमोडे पल्लवी वाकडे हर्ष नगराडे ,मंगला फुले यांनी मोर्चास संबोधित केले व उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विशेष म्हणजे EVM हटाओ लोकशाही बचाव यासाठी जन आंदोलन उभे करून मोर्चा महिलांच्या पुढाकारातून आणि सहकार्यातून काढण्यात आला. या मोर्चाकरिता आंदोलन समितीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.