सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ तालुका ब्रह्मपुरी ची सर्वसाधारण सभा संपन्न.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/०२/२४ ब्रम्हपुरी तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा ब्रह्मपुरी ची सन 2023-24 ची वार्षिक सभा 16 फेब्रुवारी ला स्वागत मंगल कार्यालय ब्रह्मपुरी येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय संजय पुरी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, माननीय रविंद्रजी घुबडे सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, माननीय वैभव खांडरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, माननीय माणिक खुणे विस्तार अधिकारी
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रामरावजी हरडे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय म.ल.बनकर शिंदेवाही,मेंडुलकर सर शिंदेवाही, प्रभाकर भाल तडक, महादेव ठाकरे ,पाटील सर चंद्रपूर ,ठेंगणे सर गोंड पिपरी, एस बी पुणेकर हरिश्चंद्र थेरे स र , तालुकाध्यक्ष प्रकाश लांजेवार, तालुका सचिव विजय वाकडे, सल्लागार नरहरी इन्कने सर जिल्हा कोषाध्यक्ष राजेश्वर सहारे,नामदेव बागमरे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय पुरी संवर्ग विकास अधिकारी यांनी आपल्या समस्या समजून दर महिन्याला पेन्शन अदालत भरवून तात्काळ समस्या सोडविण्याचा अभिवचन दिले.तर माननीय रविंद्रजी घुबडे माननीय वैभव खांडरे यांनी सेवानिवृत्तांच्या सेवानिवृत्तांच्या समस्या कोणत्याही शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्याची मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी वयाची 70 वर्ष पूर्ण झालेल्या व 80 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचे सपत्नी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभेत मागील वर्षीचे अहवाल वाचन व जमा खर्च संघटनेचे सचिव यांनी सादर केले व सभेने एक मतांनी मंजूर केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेत्रे सर,दादा राऊत, यशवंत तलमले ,श्रीमती बाळबुद्धे, प्रमोद ढोरे ,विजय राऊत, श्रीहरी बनसोड सर ,शकुंतला कोडापे मॅडम ,संध्या बगमारे मॅडम यांनी अथक परिश्रम केले. सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पोपटे यांनी केले.प्रास्ताविक प्रकाश लांजेवार तालुकाध्यक्ष व आभार अशोक शामकुळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.