कवियत्री,लेखिका सौ.संगीता वाल्मीक रामटेके/पाटील यांच्या " वेदनेचे काहूर " या काव्यसंग्रहा चे प्रकाशन सोहळा.
एस.के.24 तास
गडचिरोली : मैत्री कटा कवी मनाचा साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन नागपूर,येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.
या समूहाच्या संस्थापिका अल्का ताई धोंडणे, साखरे आयोजित केला होता.या संमेलनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल,पुष्पगुच्छ आकर्षक सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला ,तसेच या कार्यक्रमात कवियत्री सौ.संगीता वाल्मीक रामटेके यांचा " वेदनेचे काहूर " हा काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच अल्का साखरे याचे लिखित पुस्तक प्रितगंध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी या
कार्यक्रमाला उद्घाटक मा.कैलास धोंडणे साहेब ,सह उद्घाटक प्राची धोंडणे मॅडम नगरसेवक,संमेलनाध्यक्ष मा. अशोक कांबळे सर,ज्येष्ठ साहित्यिक,मा.वैभव धर्माधिकारी व्याख्याते,मा.डॉ.प्रदीप आवटे साहेब, मा.अल्का साखरे, धोडणे मंचावर शोभा वेले,संगीता ठलाल,अनिल साखरे साहेब उपस्थित होते.डॉ.आवटे साहेबांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
नंतर कवीचे कवी संमेलन घेण्यात आले.या संमेलनाचे सूत्र संचालन मा.संतोष मेश्राम सरांनी केले.